सोमवार, १ डिसेंबर, २०२५

प्रेम प्रकरण की मनाची भावना

 नांदेडमध्ये सक्षम ताटे या तरुणाची हत्या झाल्याची घटना वाचनात आली. आई वडिलांचा प्रेमाला विरोध आपण समजू शकतो. अशा वेळी आपल्या मुलीला त्यांना समजावता आले असते. त्या तरुणाची हत्या करण्याइतपत त्या संबंधित मुलीचे कुटुंबीय कसे जाऊ शकतात ?

प्रेम चुकीचे नसते, व्यक्ती चुकीची असू शकते. पण हि घटना पूर्ण वेगळी आहे. इथे आई वडिलांच्या मानसिकतेला हि समजून घेणे आवश्यक आहे. 

ज्या मुलीला आपण जन्म दिला, तिचे पालन पोषण केले तिने केवळ प्रेमविवाह करायचा हट्ट धरला म्हून त्या मुलाची हत्या करावी हे सर्वथा चूक आहे. 


या घटनेत मुलगा आणि मुलीचे कुटुंब या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे असं वाचनात आले. आजच्या काळात डोळसपणे प्रेम करायला हवं असे म्हणायला हरकत नाही. 


इथे आई वडील मुलीला समजावू शकते, तुला त्याच्या सोबत लग्न करायचे आहे ना, लावून देतो पण आधी तू शिक, स्वतःच्या पायावर उभी राहा. नंतर आपण तुझं लग्न लावू. कदाचित काही काळाने मुलीचा लग्नाबाबत विचार बदलला असता. 


एका काळाने मुलींनी पण आई वडिलांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. ज्यांनी जन्म दिला त्यांनी काही कारण असेल म्हणून लग्नाला विरोध केला असेल, आई वडिलांची समजूत काढावी त्यांचा विचार बदलला कि त्यांच्या आशीर्वादाने आणि मर्जीने लग्न करावे. कारण प्रेमात पळून जाऊन लग्न करणाऱ्या कित्येक जोडप्यांची व्यथा पाहण्यात आली आहे. लग्न केल्यावर संसार करताना अडीअडचणी सोडवताना होणारी तारांबळ खूप कठीण असते. अशा वेळी आपल्या आई वडिलांचा एक पाठिंबा असणे आवश्यक असते. 


प्रेम प्रेम असत, ते कधीही जात किंवा धर्म पाहून होत नाही. समाज म्हणून आपण अजूनही मागास आहोत. मुलींना त्यांच्या लग्नाबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यायलाच हवं. ते सध्याच्या काळाची गरज आहे. 

किती ती निगेटिव्हिटी

आजकाल टीव्ही वर किंवा सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नेगेटिव्ह नकारात्मक बातम्यांचा भडीमार दिसतो. चांगल्या बातम्या किंवा किंवा चांगल्या गोष्टी ...