शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

किती ती निगेटिव्हिटी

आजकाल टीव्ही वर किंवा सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नेगेटिव्ह नकारात्मक बातम्यांचा भडीमार दिसतो. चांगल्या बातम्या किंवा किंवा चांगल्या गोष्टी या जगातून लोप पावल्या आहेत का असं वाटू लागतं ?

कुठे घेऊन जात आहेत समाजमाध्यमं आपल्याला? त्यांच्या टीआरपीच्या खेळाला सामान्य माणूस बळी पडत चालला आहे असं वाटू लागलं आहे? कोणतेही चॅनेल सुरु करावं तर बहुतांशी हेच पाहायला मिळतं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वर सुद्धा नंगा नाच सुरु आहे असं वाटतं. चांगला कन्टेन्ट लिहिणारे किंवा आवर्जून लिहावं असं वाटणारे लोक खूप कमी झाले आहेत. 

सर्वाना लवकर प्रसिद्धी हवी आहे त्यासाठी सनसनाटी लिहावं किंवा भडक चित्रण असणारे लिहावं किंवा दाखवावं अशी मानसिकता जास्त पाहायला मिळते. 

या सर्व गोष्टींचा लहान मुलांच्या बालमनावर किती खोलवर परिणाम होत असेल याची जाणीव कदाचित आता होत नाही पण याचे दूरगामी परिणाम निश्चितच खूप भयानक असतील यात शंका नाही. 

जुना काळ असा होता तास होता, आमचं बालपण असं होत तस होत हे सर्वाना ऐकायला मिळत. काळानुसार बदल निश्चितच घडायला हवा यात दुमत नाही. पण कुठेतरी सुवर्णमध्य असणं आवश्यक आहे. 

समाजमाध्यमांवर पसरत असलेली नकारात्मता अतिशय जीवघेणी आहे, याचा आपला दैनंदिन आयुष्यावर देखील खूप परिणाम होतो. जगात आणि आपल्या देशात खूप काही चांगल्या गोष्टी देखील घडत आहेत. अतिशय चांगली लोक देखील आहेत जे खूप चांगली कामे करत आहेत. पण या टीआरपीच्या सणसणीत खेळात त्यांना जागा नाही. कारण नकारात्मक गोष्टींना मिळणारी प्रसिद्धी जास्त आहे. 

त्यामुळे आता बातम्या पाहायची इच्छा होत नाही. समाजमाध्यम सोशल मिडियावर व्यक्त होणारी लोक पाहता आता सोशल मीडिया पण वापरायला नको असं लोकांना वाटल्यास यात नवल नाही. 

जग केवळ चांगल्या माणसांमुळे आणि चांगल्या गोष्टींमुळे पुढे चालले आहे काही वाईट आणि नकारात्मक गोष्टींना अंत हा असतोच. 

किती ती निगेटिव्हिटी

आजकाल टीव्ही वर किंवा सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नेगेटिव्ह नकारात्मक बातम्यांचा भडीमार दिसतो. चांगल्या बातम्या किंवा किंवा चांगल्या गोष्टी ...